जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – ज्या वेळेस धरणगावात कोरोणाने खूपच थैमान घातले त्या वेळेस कोणीच कोणाकडे पाहत नव्हते कोणी कोणाला मार्गदर्शन पण करायला घाबरून पुढे येत नव्हते ईतकी भयावह परिस्थिती धरणगावात आणि परिसरात झाली होती जो माणुस कोरोणा रिपोर्ट चेक करायला गेला आणी जर का त्याचा रिपोर्ट पॉझिटीव आला तर त्याला घाम सुटायचा काय करावे सुचत नव्हते अशावेळेस जर कोणी चांगला सल्ला दिला तर तो माणुस त्याला देव समजायचा
असच जेव्हा माझा आणि माझ्या नातेवाईकांचे रिपोर्ट पॉझिटीव आला तेव्हा मला एक माणुस असा भेटला कि जणु साक्षात देव भेटला अस वाटू लागले मी पुर्ण घाबरून गेला होता आणि अशातच मी त्या व्यक्तींकडे गेलो आणी त्या देवरूपी माणसाने माझ्या मनातील आणि नातेवाईकांच्या मनातील भिती पुर्ण पणे बाहेर काढली. आम्हाला योग्य औषथोपचार दिला आणी घरीच correntine राहण्याचा सल्ला दिला आणी परत घरी काय काय ऊपचार करा हे पण सांगितले आणी परत त्यांनी मला सांगितले कि रात्री बे रात्री केव्हा ही काय प्राॅब्लेम आला तर फोन करा असे सांगितले हे मलाच नाही तर धरणगावातील व परिसरातील जे लोक यायचे कोरोणा रिपोर्ट पाॅझिटीव घेऊन त्यांना सांगायचे खरच हा माणुस खूपच लोकांची सेवा न घाबरता निर्धास्तपणेअल्पदरात करीत आहे.






