मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यात १५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध जाहीर केली आहे. त्यामुळे छोट्या व्यवसायिकांना आर्थिक फटका बसतोय.
यामुळे राज्यातील शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, काही घटकांकरिता राज्य सरकारकडून आर्थिक पॅकेजेस जाहीर करण्यात आले आहेत, मात्र या पॅकेजसमधूनत्यात शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिकांना वगळण्यात आले असून त्यांच्यासाठी देखील पॅकेजस जाहीर करा अशी मागणी केली जात आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत हे घटक मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. त्यांच्यासाठी पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित न्याय द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.






