शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे१३० वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियमानुसार शिर्डी नगरपंचायत कार्यालय,भीमनगर येथील समाज मंदिर व कालिकानगर येथील युवक मंडळ अशा विविध ठिकाणी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिर्डीतील नागरिकांना शासनाने दिलेल्या कोविडच्या नियमांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे याबाबत माहिती दिली, यावेळी उपनगराध्यक्ष सचिन(हरिश्चंद्र)कोते,नगरसेवक अभयभैय्या शेळके,अशोक गोंदकर, ॲडव्होकेट अनिल शेजवळ,नितीन कोते ,मंगेश त्रिभुवन,रविंद्र गोंदकर,दत्तात्रय कोते,नितीन शेजवळ,भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे,उपाध्यक्ष सुधिर शिंदे,ऍडव्होकेट अविनाश शेजवळ,मा नगरसेवक देवानंद शेजवळ, शाम कुलकर्णी, उमेश गायकवाड,नगरसेविका सौ संगिता शेजवळ,मा नगराध्यक्षा सौ अलकाताई शेजवळ,श्रीमती विमालताई मोरे, डॉ नचिकेत वर्पे,गिरीश सोनेजी आदींसह भीमसैनिक बंधू भगिनी उपस्थित होते.






