शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – बुधवार १४ एप्रिल रोजी साईनाथ रक्तपेढी येथे शिर्डी शाखेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 व्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिर्डीच्या वतीने घेण्यात आले.
सर्वत्र जगभर कोरोनाने थैमान घातले असून त्याच प्रमाणे महाराष्ट्रात ही कोरोनाची वाढती संख्या पाहुण अ.भा.वि.प. शिर्डी वतीने गरजू रुग्णांना रक्त कमी पडू नये म्हणून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत जयंती निमित्त राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्याप्रमाणात रक्ताचा तुडवडा भासत असल्याने रुग्णांची रक्त उपलब्धतेसाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
राज्यातील परिस्थिती खराब होत आहे. त्यात रक्ताअभावी कुणाचाही उपचारात अडथळा येऊ नये म्हणून रक्तदान करावे तर मग ह्या वर्षी बाबासाहेबांना कुणाचे तरी प्राण वाचवून अभिवादन केले. साई संस्थान ब्लड बँक शिर्डी येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.






