शिवाजीनगर राजवाडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – विश्वरत्न व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त शिवाजी नगर मधील राजवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.

याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण भाऊ पाटील, नगरसेविका सौ गायत्रीताई शिंदे, नगरसेवक कुंदन काळे,गजानन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते विजय राठोड (अध्यक्ष शिववंदन फाउंडेशन), उत्तम शिंदे,अभिमान आंभोरे, चंदन बिराडे, मदनलाल परदेसी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून मास्क वाटपाचा व कार्यक्रमाच्या शेवटी खीरदान करून स्वर्गीय दिलीप आबा भोसले (अध्यक्ष राजवाडा मित्र मंडळ)यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर भोसले,शंभू भोसले,गणेश अंभोरे,महेंद्र परदेशी, आकाश आंभोरे,सोनू आंभोरे,प्रवीण पगारे,संदीप जाधव,लोकेश अंभोरे, चेतन दलाल,अनिल बिराडे व राजवाड्यातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here