भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा

यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंखे) – फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे व श्री राजेंद्र तायडे, कार्यालय अधीक्षक यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून अभिवादन आयोजित करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे सदस्य डॉ दीपक सूर्यवंशी, डॉ एस व्ही जाधव, लेफ्ट डॉ राजेंद्र राजपूत, श्री राजेंद्र तायडे, प्रा व्ही एस सिसोदे, श्री आर एस सावकारे, श्री सिद्धार्थ तायडे, श्री गोपाळ देवकर, श्री गुलाब वाघोदे , श्री डी एस चव्हाण, श्री नारायण जोगी, श्री गणेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here