शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – साईनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव कोते यांनी स्वखर्चाने शिर्डीतील कोविड सेंटरला वीस बॉक्स हॅन्डगोल्ज भेट दिले. सध्या परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. शिर्डीच्या कोविड सेंटरमध्ये अतिशय चांगले उपचार व उत्कृष्ट प्रकारचे जेवण व्यवस्था पुरविली जात आहे.
गोरगरीब रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही. साईबाबा संस्थानच्या वतीने चालविण्यात येणारे कोविड सेंटर कोरोना रुग्णांसाठी आधारवड बनले आहे. शेकडो रुग्ण आजवर या ठिकाणाहून बरे होऊन सुखरुप आपल्या घरी परतले आहे. या ठिकाणी काम करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी अतिशय तळमळीने रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहे. राहाता तालुक्यातील तसेच शिर्डीतील रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, वार्डबॉय, नर्सेस यांना प्राथमिक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. याबाबतची माहिती साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय प्रशासक डॉ. मैथिली पितांबरे यांनी साईनिर्माण उदयोग समूहाचे अध्यक्ष विजयराव कोते यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच कोते यांनी त्वरीत वीस बॉक्स हॅन्डगोल्ज पितांबरे यांच्याकडे पोहोच केले. यावेळी ताराचंद कोते, भरत चांदोरे, अजय कोते, अमोल सोमवंशी, साईबाबा हॉस्पिटल कर्मचारी घनघाव आदी उपस्थित होते.






