धरणगाव लांडगे गल्ली परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव येथील लांडगे गल्ली परिसरात काही भागात पाणी सुटल्यावर सुद्धा नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नव्हते ही बाब नागरिकांनी मा.नगराध्यक्ष पी एम पाटील यांना सांगितली त्यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेतली.

लांडगे गल्ली राहिवाशांची अडचण त्यांनी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना सांगून यावर आपण संबंधित अधिकाऱ्यांना सांगून कायमस्वरूपी हा प्रश्न मिटवण्या संदर्भात चर्चा केली त्या नुसार धरणगाव न.पा.च्या पाणी पुरवठा अधिकारी सौ आराधना चव्हाण व संबंधित कर्मचारी यांनी पाहणी केली व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तेवढ्या भागापर्यंत ची पाईप लाईन तात्काळ बदलून व थोडी खोल अंतर करून नवीन पाईप लाईन टाकण्याचे आदेश दिलेत त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटेल अशी आशा व्यक्त केली.

या प्रसंगी मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर,पाणीपुरवठ्याचे लोटन चौधरी,भैय्या महाजन,लांडगे गल्ली येथील रहिवासी गणेश पाटील,माजी नगराध्यक्ष प्रकार पाटील, नगराज पाटील,नंदकिशोर पाटील,डोंगर चौधरी,श्रीमती कासुबाई चौधरी,छोटू जाधव,रवींद्र जाधव,गुलाब चौधरी,पत्रकार योगेश पी.पाटील,सतीष बोरसे,राहुल पाटील,नितीन जाधव,मीराबाई चौधरी,संजय जाधव,विमलबाई चौधरी,बाळू पाटील कैलास इंगळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here