पुणे (नारायण शेळके) – आज दिनांक 23/7/2020 रोजी पौड पो स्टे च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती वरून मौजे कोंढुर येथे इसम नामे सागर महादेव चौधरी वय 27 वर्षे रा.जांभळी ता.हवेली जि पुणे यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता अंगझडतीत त्याचे कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल ज्याची किंमत अंदाजे 50000 रु आणि 1 जिवंत काडतुस ज्याची प्रत्येकी किंमत अंदाजे 500रु असा एकूण 50,500 रु चा मुद्देमाल 1 अग्नीशस्त्र व 1 जिवंत काडतुसे , असे जप्त करण्यात आले असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील कारवाई व तपासकामी पौड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे .सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी बिबवेवाडी पो स्टे ला (पुणे शहर)05 गुन्हे दाखल आहेत.
बिबवेवाडी पो स्टे गुरंन /2020 कलम 326,324,143 मधील गुन्ह्यात सध्या फरार होता. वरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट सो.यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सफौ. दत्तात्रय जगताप , पोहवा राजू चंदनशिव,पोना विजय कांचन, गुरु जाधव,पोशी धीरज जाधव, मंगेश भगत, अमोल शेडगेे , बाळासाहेब खडके, अक्षय जावळे यांनी केलेली आहे.







