अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रातील राहिवाश्यांसाठी नियमावली

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील जे जे परिसर प्रतिबंधित म्हणून जाहिर झालेले आहेत ते वरील नकाशात नमूद आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी, व्यावसायिकांनी, दुकानदारांनी खालील नियम पाळणे अत्यावश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी.प्रतिबंधित परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अजिबातच अती महत्वाचे काम शिवाय घरा बाहेर पडू नये.विविध छोटया अंतर्गत रस्त्यांचा वापर करून अनेक नागरिक परिसरात ये जा करीत आहेत. हे पूर्णतः चुकीचं आहे. कोणत्या हि ठिकाणी नौकरी साठी, कामावर जाणाऱ्यांनी, कामगार वर्गांनी स्वतः च्या कार्यालयाला, कंपनी ला येऊ शकत नसल्याचे कळवावे. प्रतिबंधक क्षेत्रात राहणार्यांना कोणतेही ऑफिस कंपनी जबरदस्ती ने कामावर बोलावून घेऊ शकत नाही याची नोंद घ्यावी. या संदर्भात कोणीही पगार कपात करणे, कामावरून कमी करणे, कामावर येण्याची जबरदस्ती करणे असे करीत असल्यास ताबडतोब आम्हाला संपर्क साधावा त्यांचे वर गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रतिबंधक क्षेत्रात राहणाऱ्या कडे कोणीच स्वतः च्या घरी, दुकानात, बाहेरून कोणालाही कोणत्याही कारणास्तव येऊ देऊ नये. आत बाहेर जाणे येणे साठी बंदोबस्त वर असणाऱ्या पोलीस प्रशासन ला सहकार्य करावे तसेच कोणत्याही स्वरूपात दबाव आणू नये, आपल्या ला कोणतेही आजारपण चे लक्षण जाणवल्या स त्वरित स्वतः तपासणी करून घ्यावी. कोणतीही बाब लपून ठेवू नये. घरातील जेष्ठ सदस्य, लहान मुले, गरोदर महिला यांना विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here