भडगाव येथे डॉक्टर व आरोग्यसेवकांचा गौरव

धुळे (मीनाताई भोसले) – सप्तशृंगी महिला संस्था धुळे मार्फत भडगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना वॉर्डांत उत्कृष्ट काम करून 98% पेशंट करोना मुक्त करणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.यात डॉक्टर प्रतीक भोसले,डॉक्टर जाधव,डॉक्टर पंकज पाटील यांच्यासह बाकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मीना भोसले,अध्यक्ष सप्तशृंगी महिला संस्था धुळे,पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर अर्चना पाटील आदी तर सभापती विकास पाटील, उपसभापती प्रताप सोनवणे, पं.स. सदस्य रामकृष्ण पाटील, डॉ.सौ.अर्चना पाटील, डॉ.विशाल पाटील, ग.वि.अधिकारी टी.पी.मोरे, क.प्र.अधिकारी दिलीप चिंचोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुचिता आकडे, डॉ.पंकज जाधव, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.प्रतीक भोसले, डॉ.नितीन सोनवणे, डॉ. प्रशांत शेळके, डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.संजय महाले, डॉ.पूनम सांगवीकर, डॉ.नेहा अहिरराव, डॉ.संदीप पाटील व आरोग्यसेवक प्रमोद सतके, प्रमोद नेहते, चिंतामण पाटील, हंसराज महाजन, युवराज पाटील, उषा चव्हाण, सौ.अहिरे, श्री.वाडे, मोहिनीराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here