पनवेल (गणेश पाटील) – खोपोली येथील विमलनाथ जैन संघाने लॉकडाऊनमध्ये खोपोली शहरातील भटक्या मुक्या प्राण्यांसाठी खाण्याची व्यवस्था खोपोली परळी जांभूळपाडा लोहाना महाजन समाज, लायन्स क्लब ऑफ खोपोली, हास्य क्लब खोपोली, सहजसेवा फौंडेशन,खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने केली होती.
या उपक्रमासाठी विशेष सहकार्य : श्री.सुभाष अगरवाल,खोपोली, श्री.यशवंत लक्ष्मण साबळे, श्री.नंदकिशोर ओसवाल यांचे लाभले असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण डॉ.शेखर जांभळे यांनी कळविली आहे.







