रुग्णांना मिळाला श्वास : जागर प्रतिष्ठान ठरले समस्या निवारणाचे माध्यम

स्व. बंधूच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑक्सीजन प्रणाली तातडीने दुरुस्त

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – येथील ट्रॉमा सेंटर मधील ऑक्सिजन प्रणाली काही तांत्रिक कारणाने नादुरुस्त झाली होती. ही समस्या जागर प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांचेपर्यंत पोहचली. तातडीने समस्येवर दात्यांकडून निधी मिळवून उपाययोजना केली.

ट्रॉमा सेंटर मधील ऑक्सीजन प्रणाली नादुरुस्त असल्याची गंभीर समस्या डॉ. विक्रांत सोनार यांच्याकडून जागर प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा पंकज पाटील यांना माहित झाली. त्यावर तातडीने ऑक्सिजन प्रणाली दुरुस्तीसाठी टेक्निशियन यांना बोलावून घेण्याचे प्रा पाटील यांनी सांगितले. टेक्निशियन यांना देखील कामाचे महत्व लक्षात घेऊन ऑक्सिजन प्रणाली तातडीने दुरुस्त केली. आणि रुग्णांच्या आरोग्याविषयी उद्भवलेल्या गंभीर समस्येचे निराकरण वेळीच झाले. जागर प्रतिष्ठान कडे उपलब्ध असलेल्या स्व. प्रवीण हिरालाल चौधरी यांच्या स्मरणार्थ निधीतून ५२४२ रू. खर्च करीत सदर दुरुस्ती करण्यात आली.

oxygen

शिक्षक भगिनींनी जोपासला स्व. बंधूचा दातृत्वाचा वासा
पुणे येथे सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता असलेले व रावेर येथील मूळ रहिवासी हिरालाल चौधरी यांचे एकुलते एक सुपुत्र प्रवीण हिरालाल चौधरी यांचे गेल्या काही दिवसात पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अचानक घडलेल्या घटनेमुळे चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु बंधु प्रवीण हयात असताना त्यांना समाजसेवेची व गरीब दीनदुबळ्यांना निरपेक्ष भावनेने मदत करण्याची आवड होती. ही बाब घेऊन त्यांच्या भगिनी व रावेर येथील सरदार जी जी हायस्कूल मधील उपशिक्षिका नीलिमा विशाल चौधरी व प्रतिमा सचिन पाटील यांनी त्वरित बंधू स्मृती प्रीत्यर्थ जागर प्रतिष्ठान कडे समाज सेवार्थ व भुकेल्यांना अन्नदान करण्याचे आवाहन केले. सदर निधीचा अगदी महत्वाच्या वेळी उपयोगात घेत ऑक्सीजन प्रणाली दुरुस्त करून भगिनींनी मयात प्रवीण चौधरी यांना अनोख्या रीतीने रुगांना जगण्याचा श्वास देत श्रध्दांजली अर्पण केली आहे.

ट्रॉमा सेंटर मधील ऑक्सीजन प्रणाली दुरुस्ती करिता साई निर्मल फाऊंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे, जागर प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष हृषिकेश पवार, सचिव प्रा निलेश गुरूचल, कायदेतज्ज्ञ हरेश पाटील, गोकुळ सोनवणे, पवन पाटील यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here