नंदुरबार जिल्ह्यात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा मोठा घोळ : खासदार हिना गावित यांचा प्रशासनावर आरोप

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ सातत्याने होत आहे म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांची रेमेडीसीवर इंजेक्शन्ससाठी एकच धावपळ सुरू आहे. असे असले तरी रेमेडीसीवरची जिल्ह्यात कृत्रिम टंचाई व काळाबाजार सुरू असल्याची तक्रार सर्वसामान्य जनतेकडून करण्यात आली होती.म्हणून प्रशासनाकडून हॉस्पिटलांना रेमीडीसीवर पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले असले तरी खाजगी रुग्णांना दिल्या गेलेल्या इंजेक्शनच्या वाटपाची आकडेवारी खोटी असून त्याचा हिशोब द्यावा अशी मागणी तथा आरोप खासदार हिना गावित यांनी केला आहे.

जिल्ह्यात रेमीडीसीवरचा तुटवडा जिल्हाधिकारी व अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांनी मुळेच निर्माण झाला आहे म्हणून रेमेडी सेवीर इंजेक्शन न मिळाल्याने अनेक रुग्णांना त्यांचा प्राण गमवावा लागला आहे. असे असताना प्रशासनाचे इंजेक्शन वाटपाचे नियोजन बारगळले असून गोरगरिबांसाठीचे इंजेक्शन पुणे व मुंबई येथील धनदांडग्यांनकडे जात असल्याचा आरोप खा. डॉ.हिना गावित यांनी केला आहे.रोटरी वेलनेस सेंटरला इंजेक्शनचा साठा प्राप्त व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पत्र दिले आहे. अन्न व औषध प्रशासन मोजक्याच वितरकांची तपासणी करीत आहे. अशाप्रकारे प्रशासन स्वतःच्या चुका लपवत असून लोकप्रतिनिधींना बदनाम करीत आहे.

प्रशासनातील रेमडिसीवर इंजेक्शन वाटपात कमालीचा घोळ उघड झाला असून वाटप करण्यात आलेल्या खाजगी हॉस्पिटल्सना आवश्यक तेवढे व दिलेल्या आकडेवारीपेक्षा कमी इंजेक्शन मिळाल्याचे समोर आले आहे .जिल्हाभरात सर्वसामान्य जनता कलिंग 19 संक्रमणामुळे अडचणीत असल्याचा फायदा प्रशासन घेत असले तरी आता त्यांचे पितळ उघडे पडले आहे.परंतू रेमेडीसिवर इंजेक्शन न मिळाल्याने जीव गमवावा लागलेल्या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण? तसेच मरणाऱ्याच्या टाळुचे लोणी खाणारे महाठग कोण? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here