नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – चॉकलेटचे आमिष दाखवून ४५वर्षीय नराधमाने नऊवर्षीय मुलीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना नंदनवन भागात उघडकीस आली.
दशरथ वामन मेश्राम (वय ४५) असे या नराधमाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही मुलगी घरासमोर खेळत होती. दशरथने तिला चॉकलेटचे आमिष दाखविले, तिला घरी नेले. तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीचे वडील घराबाहेर आले. मुलगी वडिलांना दिसली नाही. त्यांनी तिचा शोध सुरू केला.
काही वेळात मुलगी दशरथच्या घरातून घाबरलेल्या अवस्थेत बाहेर येताना दिसली. दशरथही घराबाहेर आला. मुलीच्या वडिलांना बघताच दशरथ पसार झाला. मुलीच्या वडिलांच्या प्रकार लक्षात आला. त्यांनी नंदनवन पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दशरथ याला अटक केली.







