मुंबई (हितेश मिस्त्री) – बुधवार (दि.१५ जुलै) सोनार महेंद्र मांगीलाल जैन (वय ४५) यांच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिस ठाण्यात गॅस
कटरचा वापर करुन सोन्या चांदीच्या दुकानात चोरी केल्याचा चेंबूर पोलीस ठाणे गुरक्र 272/2020 कलम 454,457,380,34 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि ओलेकर,पो उप नि प्रदीप पाटील व पो ह जाधव, साळुंखे, पो शी पवार,पाटील, सुधीर माने ,प्रदीप माने यांनी सी सी टी व्ही फूटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने जाहिद याकूब मुनेजात (वय 24 वर्षे राठी रु न 69,नागु सयाजी चाळ, फारस रोड,नागपाडा,मुंबई) व तालिब गुल्फाम राजपूत (वय 16 वर्षे ) या दोघांना फारस रोड, नागपाडा मुबंई येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना अटक करण्यात आली व संबंधित चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला.
Home Uncategorized सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून मालमत्ता जप्त; चेंबूर पोलिसांची कारवाई







