कल्याणच्या श्वास हॉस्पिटलने माणुसकीचा धर्म पाळून प्रहार पक्षाच्या मागणीवरून केले लाखोंचे बिल कमी

कल्याण (प्रतिनिधी) – कोरोना महामारी मध्ये कल्याणमध्ये वाढते रूग्णाच्या समस्या लक्षात घेता महानगरपालिकेच्या अपुरे सुविधांमुळे कोरोना रुग्णांनाना खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धाव घ्यावी लागत आहे. रुग्णावर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात केंद्र शासन राज्य शासन महानगरपालिका यांच्याकडे कोणतेही ही सुविधा नसल्यामुळे सर्व सुविधा कागदावरच कोरोनाच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान लाखो रुपयाला खिशाला कात्री बसत आहे. कल्याणमध्ये एका मध्यम वर्गीय कुटुंबातील नागरिकाला कोरोना ची बांधा झाली होती.
त्यामुळे कल्याण मध्ये महानगरपालिकेमध्ये कोणतीही सुविधा नसल्यामुळे रुग्णाला उपचारासाठी कल्याण येथील श्वास रुग्णालयात धाव घ्यावी . लागल्या असल्यामुळे सदर कोरोना असलेल्या रुग्णांची परस्थिती अत्यंत क्रिटिकल असल्यामुळे रुग्णावर तत्काल उपचार करणे बंधन कारक होते. त्यामुळे हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना खर्चाबद्दल सर्व माहिती देऊन तत्काल रुग्णावर उपचार सुरू केले। सदर रुग्णावर 16 दिवस औषध उपचार केल्यामुळे रुग्णाची तब्येत व्यवस्थित झाले आहे. पण सदर वाढीव बिलावर रुग्णावर केलेल्या औषध उपचारामुळे हॉस्पिटलच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली 16 दिवस क्रिटिकल कंडिशन रुग्णावर मोठ्या प्रमाणात औषध उपचार केल्यामुळे हॉस्पिटलचे बिल वाढीव येणे हे सहाजिकच आहे .
त्याकरिता हॉस्पिटलचे वाढीव बिल किती येईल अशी भीती मनात ठेवून रुग्णांच्या नातेवाईकांनी वाढीव बिल कमी करण्यासाठी थेट राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांना वाढीव बिला संदर्भात तक्रार केली , त्वरीत बच्चू कडू राज्यमंत्री साहेबांनी सदर तक्रार एडवोकेट स्वप्नील पाटील यांना देत सदर महिलेस वाढीव बिलासंदर्भात मदत करण्यास सांगितले .
स्वप्नील पाटील जिल्हाध्यक्ष यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख आदर्श भालेराव व तालुका सचीव प्रदीप सोनवणे जी यांना सदर महिलेस हवी ती मदत करण्यास सांगितले प्रकार लक्षात घेता आदर्श भालेराव तालुका संघटक व कल्याण सचिव प्रदीप सोनवणे मानवी अन्याय निर्मूलन संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष सौ सुवर्णा कानवडे यांनी कल्याण पश्चिम येथील श्वास हॉस्पिटल येथे धाव घेतली .श्वास हॉस्पिटल त्यातील डॉक्टर ढगे यांची भेट घेऊन सदर चर्चा केली डॉक्टर ढगे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे मागणी लक्षात घेता हॉस्पिटलमध्ये बिलिंग विभाग पाहणारे डॉक्टर पाटील यांच्याशी भेट करून दिली असता पाटील यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणी लक्षात घेता व रुग्णाची परिस्थिती पाहता तत्काल मानवधर्म लक्षात घेऊन रुग्णास आलेले 16 दिवसाचे हॉस्पिटल बिल मेडिसिन लॅब एक्स-रे डॉक्टर चार्ज RMO चार्ज नर्सिंग चार्ज, PPE किट व इतर चार्ज मिळून वाढीव बिल औषधोपचार सहित (3250000) तीन लाख पंचवीस हजार रुपये आले असते कोरोना महामारी मध्ये रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता प्रहार पक्षांच्या मागणीवरून डॉक्टर पाटील यांनी कोणतेही वादविवाद न करता तत्काल तीन लाख पंचवीस हजार मधील मेडिकल चार्ज, क्सरे, डॉक्टर विजिट, चार्ज, RMO चार्ज नर्सिंग चार्ज PPE किट चार्ज व पालिका नियमानुसार बेड चार्ज लावून 16 दिवसाचे औषधी उपचार सहित 1 लाख नव्वद हजार रुपये घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचा मागणीमुळे कल्याण मध्ये कोरोना महामारी चे मोठे प्रमाण असताना देखील श्वास हॉस्पिटल यांनी एक लाख पस्तीस हजार रुपये माफ करून कल्याण येथील श्वास हॉस्पिटल यांनी माणुसकीचा धर्माचे पालन केले आहे.
श्वास हॉस्पिटल येथील एक लाख पस्तीस हजार रुपये हॉस्पिटलने रुग्णाच्या मदतीस धावून आलेल्या प्रहार जनशक्ती पक्ष च्या मागणीमूळे माफ केल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी श्वास हॉस्पिटल व प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here