मायक्रोफायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या महिलांना कर्जाची परतफेड करण्यासाठी सवलत मिळावी

महिला बचत गटांतर्फे आ. प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

सोलापूर (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड)– संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारने राज्यामध्ये कडक निर्बंध लागू केले आहे.

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार असून त्यांचा उदरनिर्वाह रोजदारीवर आहे. परंतू सध्याच्या लॉकडाऊन मुळे त्यांची रोजदारी बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे.

सदर महिलांनी त्यांचे दैनंदिन जीवन, उपजीवीका व विविध कारणास्तव बचत गटाच्या माध्यमातून मायक्रोफायनान्स कडून कर्ज घेतले आहेत. या कर्जांची परतफेड कशी करायची व आपले दैनंदिन जीवन, उपजिवीका कशी चालवायची असा प्रश्न महिलांसमोर उभा आहे. सदर महिलांना मायक्रोफायनान्स कंपनी कडून होत असलेली सक्तीची कर्ज वसुली थांबवून कामगार महिलांना कर्जाची परतफेड करण्यासाठी सवलत मिळण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाव्दारे मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here