माडगुळकरांच्या प्रश्नांवर जयंतराव पाटील यांचे लक्ष वेधणार !

  • सुशांत देवकर , आनंदरावबापू पाटील , सादिक खाटीक यांचे आश्वासन !

आटपाडी (प्रतिनिधी) – परमेश्वरी शक्तीचा अंश लाभलेल्या महाराष्ट्र वाल्मीकी ग . दि .माडगूळकर, थोर साहित्यीक व्यंकटेशतात्या माडगूळकर, प्रा. डॉ. अंबादास माडगूळकर, कथाकार अॅडव्होकेट नानासाहेब झोडगे आदी महनीयांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या जगविख्यात ” माडगुळे ” गावी बामणाचा पत्रा, माडगूळकरांचे निवास स्थान, संरक्षित करून, माडगुळकर बंधुचे जागतिक उंची आणि दर्जाचे स्मारक निर्माण करणे, माडगुळे गावी येणाऱ्या देशभरातील साहित्यप्रेमी, माडगूळकर प्रेमींसाठी प्रशस्तसुशांत देवकर , आनंदरावबापू पाटील , सादिक खाटीक यांचे आश्वासन !
आटपाडी (प्रतिनिधी) – परमेश्वरी शक्तीचा अंश लाभलेल्या महाराष्ट्र वाल्मीकी ग . दि .माडगूळकर, थोर साहित्यीक व्यंकटेशतात्या माडगूळकर, प्रा. डॉ. अंबादास माडगूळकर, कथाकार अॅडव्होकेट नानासाहेब झोडगे आदी महनीयांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या जगविख्यात ” माडगुळे ” गावी बामणाचा पत्रा, माडगूळकरांचे निवास स्थान, संरक्षित करून, माडगुळकर बंधुचे जागतिक उंची आणि दर्जाचे स्मारक निर्माण करणे, माडगुळे गावी येणाऱ्या देशभरातील साहित्यप्रेमी, माडगूळकर प्रेमींसाठी प्रशस्त २५ सुटचे शासकीय विश्रांतीगृह, महाडीकवस्ती – लिंगडे वस्ती वगैरे वस्त्यांवरील पिण्याच्या प्रश्न आणि महाडीकवस्ती लगतच्या बुद्धीहाळ तलावाच्या कॅनॉल मधून नवा प्रवाही मार्ग काढणे तसेच लेंगरेवाडी – बंडगर वाडी – माडगूळे – शेटफळे या चार रस्त्याच्या चौकाजवळ च्या बंदीस्त पाईपलाईन मधून माडगूळे ओढ्यावरील सर्व बंधारे भरून देण्याच्या प्रश्नी राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील साहेब यांचे लक्ष वेधून हे प्रश्नी मार्ग काढण्यासाठी त्यांना साकडे घालणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर – आटपाडी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, मतदार संघाचे माजी अध्यक्ष, पाणी संघर्ष चळवळ, श्रमिक मुक्ती आंदोलनाचे प्रणेते, बंदिस्त पाईपलाईन पथदर्शक प्रकल्पांसाठी सतत आग्रही राहीलेले तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आनंदरावबापु पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत या पदाधिकाऱ्यांनी माडगूळेतील विविध ठिकाणी भेट देवून पाहणी करीत वरील आश्वासन दिले .

गावच्या विविध प्रश्न, समस्या,अडचणी वर तोडगा काढण्यासाठी कोरोणा महामारीचा जोर ओसरताच माडगुळ्यात ना. जयंतराव पाटील साहेबांना आणण्याचा आमचा मानस असून तत्पूर्वी स्मारक प्रश्न, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न, शेतीच्या पाण्याच्या प्रश्नातील ओढ्यातील साखळी बंधारे भरण्याच्या प्रश्नी काही दिवसातच जयंतराव पाटील साहेबांची भेट घेऊन या प्रश्नी त्यांचे लक्ष वेधत यावर मार्ग काढण्यासाठी आपण विनवणार असल्याचे सुशांत देवकर, आनंदरावबापु पाटील सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले .

राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब लिंगडे यांच्या आग्रहावरून माडगूळे दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा भाऊसाहेब लिंगडे परिवाराचे वतीने सत्कार करणेत आला . भाऊसाहेब लिंगडे यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी समारंभात अनिल दिनकर बाबर, प्रविण तातोबा बाबर, ग्रा.पं. सदस्य अमोलशेठ विभूते, नितीन लिंगडे, यशवंत खळगे, सुभाष विभूते, दामोदर लिंगडे, अतुल विभुते, किशोर विभूते , सागर लिंगडे उमेश लिंगडे हे उपस्थित होते . २५ सुटचे शासकीय विश्रांतीगृह, महाडीकवस्ती – लिंगडे वस्ती वगैरे वस्त्यांवरील पिण्याच्या प्रश्न आणि महाडीकवस्ती लगतच्या बुद्धीहाळ तलावाच्या कॅनॉल मधून नवा प्रवाही मार्ग काढणे तसेच लेंगरेवाडी – बंडगर वाडी – माडगूळे – शेटफळे या चार रस्त्याच्या चौकाजवळ च्या बंदीस्त पाईपलाईन मधून माडगूळे ओढ्यावरील सर्व बंधारे भरून देण्याच्या प्रश्नी राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील साहेब यांचे लक्ष वेधून हे प्रश्नी मार्ग काढण्यासाठी त्यांना साकडे घालणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर – आटपाडी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, मतदार संघाचे माजी अध्यक्ष, पाणी संघर्ष चळवळ, श्रमिक मुक्ती आंदोलनाचे प्रणेते, बंदिस्त पाईपलाईन पथदर्शक प्रकल्पांसाठी सतत आग्रही राहीलेले तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आनंदरावबापु पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत या पदाधिकाऱ्यांनी माडगूळेतील विविध ठिकाणी भेट देवून पाहणी करीत वरील आश्वासन दिले .

गावच्या विविध प्रश्न, समस्या,अडचणी वर तोडगा काढण्यासाठी कोरोणा महामारीचा जोर ओसरताच माडगुळ्यात ना. जयंतराव पाटील साहेबांना आणण्याचा आमचा मानस असून तत्पूर्वी स्मारक प्रश्न, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न, शेतीच्या पाण्याच्या प्रश्नातील ओढ्यातील साखळी बंधारे भरण्याच्या प्रश्नी काही दिवसातच जयंतराव पाटील साहेबांची भेट घेऊन या प्रश्नी त्यांचे लक्ष वेधत यावर मार्ग काढण्यासाठी आपण विनवणार असल्याचे सुशांत देवकर, आनंदरावबापु पाटील सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले .

राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब लिंगडे यांच्या आग्रहावरून माडगूळे दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा भाऊसाहेब लिंगडे परिवाराचे वतीने सत्कार करणेत आला . भाऊसाहेब लिंगडे यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी समारंभात अनिल दिनकर बाबर, प्रविण तातोबा बाबर, ग्रा.पं. सदस्य अमोलशेठ विभूते, नितीन लिंगडे, यशवंत खळगे, सुभाष विभूते, दामोदर लिंगडे, अतुल विभुते, किशोर विभूते , सागर लिंगडे उमेश लिंगडे हे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here