डॉ.बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा – सौ.मनिषा भोईर; पेण-बेणसे येथे रक्तदान शिबीर

  • श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आयोजन

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – बुधवार रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या संयुक्त जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन सम्यक कला,क्रिडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था बेणसे.(रजि.)पेण- रायगड महाराष्ट्र यांच्या विद्यमाने सिध्दार्थ नगर बेणसे-पेण आयोजन करण्यात आले होते.यावेळी एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी सोशल डिस्टसिंग, मास्क्, सँनिटायझर इ.कोरोना काळात शासन नियमांचे पालन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अडसुळे यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे पेण पंचायत समितीच्या सभापती सौ.मनिषा संजय भोईर यावेळी म्हणाल्या की, डाॅ.बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहून सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्यत न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता हे मुलभूत अधिकार आपणाला दिले.भारतीय राज्यघटनेची तत्वे प्रमाणभूत मानून स्थानिक पातळीवर आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपले कार्य करावे. विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब जयंतीच्या निमित्ताने रक्तदान करून माणुसकीची नाती जोडण्याचे पवित्र काम केलेत,ही डाॅ.बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे.

सम्यक कला,क्रिडा,शैक्षणिक व सामाजिक संस्था बेणसे.रजि.महाराष्ट्र यांच्या विद्यमाने महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , स्त्री उध्दारक महात्मा ज्योतिबा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात त्या बोलत होत्या. संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग अडसुळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्स नागोठणेचे कामगार नेते साधुराम मालुसरे रिलायन्स एच .आरचे उदय दिवेकर,इस्टेट मॅनेजर अजिंक्य पाटील,बेणसे सरपंच मधुकर पारधी,उपसरपंच संतोष अडसुळे,रिलायन्स वैद्यकीय अधिकारी विनोद कुमार,डाॅ.पुरुषोत्तम भोईर,शेडसई सरपंच सौ.प्रिया कडू,कामगार नेते अरुण कुथे,माजी सभापती संजय भोईर,पिगोंडे ग्रामपंचायत सदस्य शैलेश शेलार,लक्ष्मण खाडे,बेणसे ग्रामपंचायत सदस्य सौ.प्रिती कुथे,उध्दव कुथे,रोहा तालुका मनसे नेते प्रल्हाद पारांगे,सतीश जवके,अशोक भोय, शिवचरित्र व्याख्याते सचिन काटे,जेष्ठ समाजसेवक अमित उजगरे,नितीन भाजरंगे,महेंद्र पानसरे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पेण तालुका नेते अमित कांबळे,समाजसेवक मनोज पाटील,शिवसेना महिला आघाडीच्या दर्शना जवके,मंजूळा म्हात्रे,माजी उपसरपंच नरेश पाटील,भगवान शिंदे,प्रदीप कोळंबेकर,निकेत सुर्वे,अँड .विजयपाल सावंत, सम्यक सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष भाई दिनेश कडू,सचिव प्रमोद काकडे,कोषाध्यक्ष मंगेश पोंगडे,प्रमोद शेलार,विशाल अभंगे,विजय अडसुळे,अमित अडसुळे,बाळा वाघमारे,आदिनाथ अडसुळे,हे यावेळी उपस्थित होते.

यानंतर अरूण कुथे,चंद्रकांत अडसुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सम्यकचे अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग अडसुळे यांनी आपले २६ वे रक्तदान करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आले. नागोठणे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांनी धावती भेट देऊन शुभेच्छा दिल्या. धम्मचक्र परिवर्तन समिती रिलायन्स टाऊनशीप यांचे पदाधिकारी एम.पी. कांबळे,राजेंद्र मोरे यांनी २४ पुस्तके व रिलायन्सचे अधिकारी राजेंद्र मोहिते १०१ पुस्तके नालंदा बुध्दविहाराला दान केली त्यांचा विशेष कौतुक सम्यक संस्थेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी रक्तदान शिबीरात चौतीस पुरूष व एकमेव महिला सौ.अनिता राजेश गायकवाड हिने रक्तदान केले संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले.आलेल्या रक्तदात्यांना भोजनदान प्रमोद महादेव शेलार यांनी दिले .जिल्हा रुग्णालय अलिबाग रायगड रक्तपेढी तर्फे डॉ हर्ष गुजराती, हेमकांत सोनार, पुनम पाटील, प्रसाद पाटील, महेश घाडगे, रविंद्र कदम यांनी रक्तसंकलनाचे काम केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद काकडे ,प्रफुल्ल शेलार, वैभव काकडे,कांचन अडसुळे,कविता संतोष अडसुळे,पुजाअडसुळे, नंदाबाई अडसुळे,आशा शिंदे,आशा भगत,सहदेव भगत,मधुकर कुथे,निलेश शेलार, प्रणाम सावंत यांनी परीश्रम घेतले या शिबिराला शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद काकडे यांनी केले.व आभार विशाल अभंगे यानी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here