झारखंडमध्ये माणुसकीचा अंत !

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशातील झारखंड जिल्ह्यात एक किळसवाणी घटना घडली असून माणुसकीचा अंत पहायला मिळाला. एका ३५ वर्षीय महिलेवर तब्बल ११ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

मुख्य म्हणजे, गँगरेप करणारे आठ ही आरोपी कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आले असून बलात्कार पीडितेलाही कोरोना संसर्ग झाल्याची माहिती आहे. झारखंड जिल्ह्यातील पाकुडमध्ये ही घटना घडली असून सामूहिक बलात्कारानंतर पीडिता दोन दिवस बेशुद्धावस्थेत होती.

महिलेच्या नातेवाईकांनी तिच्यासह मुफस्सिल पोलीस ठाण्यात धाव घेऊन कुकर्माची माहिती दिली. एसपी मणिलाल मंडल यांच्या टीमने दहा तासांच्या आत ११ आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर आरोपींमध्ये पीडितेच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. सर्व आरोपींवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत लिट्टीपाडा कोव्हिड-१९ मॅनेजमेंट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here