मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण पसरले असून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कुत्र्यामांजराप्रमाणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत फडणवीसांना अटक करण्याची मागणी केलीय. त्यावरुन आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांना मजेशीर रित्या खडेबोल सुनावले आहेत. फडणवीसांना अटक करणं म्हणजे अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारला आहे.
“उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस यांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय? रेमडेसिव्हीर राज्यसरकारलाचं देणार होते. संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं. माहिती तर घ्यायची आधी. सरकार म्हणतं सहकार्य करा. आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे” असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांची खिल्ली उडवली.






