महाराजांच्या भूमीतील कन्येची दमदार कामगिरी !

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – शुक्रवारी भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील गिर्यारोहकांना अभिमान वाटावा अशी एक घटना घडली ती म्हणजे लहान वयात विविध शिखरांवर चढाई करणा-या साता-याच्या प्रियांका मंगेश मोहिते हिने अन्नपूर्णा पर्वतावर यशस्वी चढाई केली आहे.

शुक्रवारी ( १६ एप्रिल) रोजी प्रियांका अन्नपुर्णाच्या शिखरील टोकावर पोहचली असून या शिखरावर यशस्वी चढाई करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक म्हणून प्रियांका मंगेश मोहितेची पुन्हा एका नव्याने ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्राची सुपुत्री असलेल्या प्रियांका मोहिते हिने अवघ्या २१व्या वर्षी माऊंट एव्हरेस्टवर यशस्वीरित्या चढाई केली होती. सर्वाधिक कमी वयात हा पर्वत चढणारी प्रियांका ही तिसरी भारतीय महिला ठरली होती. नेपाळ मधील ‘ अन्नपूर्णा पर्वत ‘ चढाई करण्यात खूप अवघड आहे अनेक गिर्यारोहकांची समजले जात असून सर्व गिर्यारोहकांचे दमछाक होत असते. याची उंची सुमारे आठ हजार ९१ मीटर इतकी आहे. याआधी सहा भारतीयांनी हे शिखर यशस्वी चढले आहे. प्रियांका हिचा एक महिला गिर्यारोहक म्हणून खूप नावलौकिक झाला आहे.

सोशल मीडियातून प्रियांकावर अभिनंदनाचा वर्षाव हाेत असून या माेहिमेसाठी प्रियांकाला सहकार्य करणारे आनंद शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून तिचे अभिनंदन करताना महाराष्ट्रातील अऩ्य गिर्यारोहकांचेही कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here