माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कोरोनाच्या विळख्यात

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे अगदी सामान्यांपासून राजकारणातील मोठमोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

यातच आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले असून डॉ. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, देशात सुरु असलेली कोरोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं ,ज्यामध्ये त्यांनी कोरोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच लसपुरवठय़ास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावीत, अशी सूचनाही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here