शेतातील तारेच्या कुंपणाचा शाँक लागून शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू

  • तब्बल सत्तरा तासानंतर महिलेवर अंत्यविधी,
  • तिघा बापलेकांवर गुन्हा दाखल,
  • विहामांडवा येथील दुर्देवी घटनांची.

पैठण (प्रतिनिधी)- रानटी डुकरांच्या नासाडीपासून ऊसाच्या शेतामध्ये लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपणात बेकायदेशीर वीजप्रवाह सोडल्याने एका शेतमजूर महिलेला जोरदार शाँक बसल्याने तिचा जागीच तडफडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना विहामांडवा ता.पैठण येथे बुधवारी ता.२२ दुपारी तीनच्या सुमारास घडली.
दरम्यान मयत महिलेच्या नातेवाईकांनी जोपर्यंत संबधीतांवर गुन्हा दाखल करुन आरोपिंना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.परंतु पोलीसांनी मध्यस्थी करुन नातेवाईकांची समजूत घालून या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर मयत महिलेवर तब्बल सतरा तासानंतर अंत्यविधी करण्यात आला.या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी माञ फरार झाले. समीना फेरोज सय्यद वय (३५ ) रा.विहामांडवा ता.पैठण असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,विहामांडवा ता.पैठण येथील फेरोज सय्यद यांची गावाजवळ शेती असून घरी शेती करने परवडत नसल्याने त्यांनी यंदा गावातील ललीत भगवान निंबाळकर यांना बटाईने शेती करण्यास दिली.शेतात ऊसाची लागवड करण्यात आल्याने रानटी डुकरांपासून ऊसाची नासाडी होऊ नये यासाठी ललीत निंबाळकर यांनी गट.नं.५१३ या ऊसाच्या शेतामध्ये तारेचे कुंपण लावून त्यात आकडे व्दारे विद्युत विजप्रवाह सोडला होता. समीना सय्यद ह्या त्या ठिकाणी रोजंदारीवर खत टाकण्याच्या कामासाठी शेतमजूर म्हणून बुधवारी ता.२२ रोजी गेल्या होत्या.दरम्यान दुपारी तीन वाजता कामाच्या नादात त्यांचा पाय रान डुकरांसाठी लावण्यात आलेल्या तारेवर पडताचा त्यांना जबरदस्त विजेचा शाँक बसला.या घटनेत त्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. यावेळी ब्रम्हगाव येथील शेतकरी जगताप हे जात असतांना त्यांना बांधावर निपचीत पडलेली महिला दिसली. याची माहिती त्यांनी लगेच बाजुच्या शेतामध्ये काम करणारे अजीम सय्यद यांना कळविली.त्यांनी धावघेत घटनास्थळी जावून बघितले तर सदर महिला ही त्यांची चूलत भावजायी समीना सय्यद दिसली.त्यांनी लगेच इतरांच्या मदतीने भावजायीस उचलून ताबडतोब विहामांडवाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यादव सोनकांबळी यांनी तपासून त्यास मृत झाल्याचे घोषित केले.

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

रानटी डुकरांच्या उपद्रव्यामुळे ऊसाला हानी पोहोचू नये यासाठी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी याठिकाणी तारेचे कुंपण लावण्यात आले होते.तसेच बेकायदेशीर आकडा टाकून विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता.मयत महिलेच्या पतीने पाच सहा दिवसापूर्वीच बटाईदार शेतकऱ्यास तारेचे कुंपण काढण्या संबंधी हटकले होते.परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तसेच शेतातील राञीच्या वीजेचा वेळ बदलून दिवसा सुरू झाल्याने या तार कुंपणात विज प्रवाह तसाच राहिल्याने शेतकऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका शेतमजूर महिलेस स्वतःचे जीव गमवावे लागले.मयत महिलेच्या कुटुंबियांनी जोपर्यंत दोषीविरुध्दात गुन्हा दाखल करुन अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.पोलीसांनी नातेवाईकांची समजूत काढून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी ता.२२ रोजी मध्यरात्री पाचोड ता.पैठण पोलीस ठाण्यात ललित भगवान निंबाळकर,मनोज ललित निंबाळकर,बाळू ललित निंबाळकर रा.विहामांडवा ता.पैठण या तिघा बाप लेकांविरुध्दात भांदवि कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुरुवारी ता.२३ सकाळी आठ वाजता मयत महिलेवर तब्बल सतरा तासानंतर शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.सदर महिलेच्या पश्चात दोन मुले पती असा परिवार आहे.दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी जाऊन तारीचे कुंपण गुंडाळून ठेवलेली गोणी ताब्यात घेतली. या घटनेचा पुढिल तपास विहामांडवा पौलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्ष गोरक्षक खरड हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here