गावातील महिलांजवळ चुकीचे बोलत असल्याच्या कारणावरून मारहाण शिवीगाळ.

यावल(सुरेश पाटील) – गांवातील महिलांना जवळ काहीतरी चुकीचे बोलत आहे या कारणावरून संशय घेऊन एकाने दोन महिलांना व एका पुरुषाला शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटना तालुक्यातील चितोडा गांवात घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की आरोपी सुभाष मुरलीधर पाटील राहणार चितोडा तालुका यावल यांनी दिनांक 22 जुलै 2020 बुधवार रोजी रात्री 7:30 वाजता घराजवळ सार्वजनिक जागेवर माझी सासू ही आरोपी बाबत गांवातील महिलांना जवळ काही चुकीचे बोलत आहे या कारणावरून संशय घेऊन मला माझे पती आणि सासू यांना शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यावरून यावल पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नंबर 553 / 2020 भादवि कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here