जळगावात झारखंडमधील मजुराची आत्महत्या

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – स्त्याच्या कामासाठी आलेल्या परराज्यातील मजुराने शेताच्या बांधावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील तिघ्रे शिवारात सोमवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. संतोष राय भीम राय (वय २३, मुळ रा. झारखंड) असे मृत मजुराचे नाव आहे.

संतोष राय हा काही सहकाऱ्यांसोबत गेल्या तीन महिन्यांपासून जळगाव तालुक्यातील तीघ्र येथे मजुरीसाठी आला होता. तिघ्रे शिवारातील रस्त्याच्या कामावर मजुरी करीत होता. रविवारी सोबत काम करणाऱ्या मजुरांसह त्याने रात्री जेवण केले. यानंतर वडिलांना फोन करून गप्पा केल्या. दरम्यान, यावेळी तो प्रचंड तणावात असल्याची माहिती समोर आली.

सोमवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास संतोष याने तिघ्रे शिवारातील शेनफडू पुंडलिक पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला रूमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यानंतर नागरिकांनी त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आले. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here