कोरोनामुळे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – कोरोनामुळे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन झालं आहे. आज दुपारी 12.30 च्या सुमारास ठाण्यातील रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाने या हसऱ्या अभिनेत्याला काळाच्या पडद्याआड केलं. काही वर्षांपूर्वी किशोर नांदलस्कर यांना दम लागणे, छातीत धडधडणे असे शारीरिक त्रास सुरू झाले होते. वैद्यकीय तपासांनंतर त्यांची बायपास करण्यात आली होती.

अभिनेते किशोर नांदलस्कर मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित 5 व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची नामांकने जाहीर करण्यात आली होती. गेली पन्नासहून अधिक वर्षे विविध भूमिकांच्या माध्यमातून दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ कलाकार किशोर नांदलस्कर यांना 2021 वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.

दरम्यान, किशोर नांदलस्कर यांच्या रंगभूमीच्या कारकीर्दिबद्दल बोलायचं झालं तर ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होतं. तर त्यांच्या ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here