मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथेच त्यांच्यावर पुढील 14 दिवस उपचार करण्यात येतील अशी प्राथमिक माहिती आहे.

अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळत आहे.

याआधी सुद्धा ऑक्टोबर 2020 मध्ये अमित ठाकरे यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, अमित ठाकरे यांची कोरोनाची चाचणी ही निगेटीव्ह आली होती. व्हायरल फिव्हर झाल्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

दुसरीकडे मागील आठवड्यात राज ठाकरे यांना सुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. राज ठाकरे यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here