नाशिक मधील सर्व नागरिकांची घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिलात सवलत द्यावी – तन्मय गांगुर्डे

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर दिनांक २२ पासून समाजातील सर्वच घटकांची अत्यंत कठीण परिस्थितीत झाली आहे.मंडई,रिक्षा,मिनी शॉप,जनरल स्टोअर्स छोटे उद्योग धंदे करणारे स्वयंरोजागर वाले कामगार वर्ग आधी सर्वाचे आपापले रोजीरोटीचे व्यवसाय एकतर पुर्णपणे बंद आहेत.किंवा शासनाने दिलेल्या सवलतीच्या वेळेस रडतखडत सुरू आहेत अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीत सामाना प्रत्येक नाशिकरकर नागरिकांना करावा लागत आहे.अशा कठीण परिस्थितीत नाशकातील महानगरपालिका,नगरपरिषदा व नगरपंचायती मधील नागरिकांच्या मिळकतीची सण २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षातील घरपट्टी पाणीपट्टी लाईट वीजबिल रक्कमेवर काही प्रमाणात सवलत देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला पाहिजे.
कोरोनाने जगभर थैमान घातले असून अनेक देशांचे कंबरडे मोडले असतानाही सामान्य माणूस जगला पाहिजे.अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.राज्य शासननाने कृषी विषयक तसेच वीज बिलाबाबत नागरिकांना सवलत देण्यात अनेक उपाययोजना केल्या पाहिजेत.त्याच धर्तीवर नाशिक नागरिकांना दिलासा घ्यावा.अशी आमची मागणी आहे.ज्यावेळी दैनंदिन गरजा भागवणे नाशिककर धडपडत आहेत.त्यावेळी त्यांच्यावर घरपट्टी पाणीपट्टी लाईट वीजबिलचा बोजा न टाकता नागरिकांच्या जगण्याला माणुसकीच्या भावनेतून शासनाने बळ दिले पाहिजे अशी नाशिकराची सर्व स्थरावरन मागणी होत आहे.म्हणूनच सण २०२०/२१ या आर्थिक वर्षातील नागरी हद्दीतील सर्व नागरिकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी लाईट वीजबिलची रक्कम राज्य शासनाने सवलत द्यावी किंवाहुना अशा संसर्गजन्य रोगाच्या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रातील घरपट्टी आणि पाणीपट्टी लाईट वीजबिल माफ करण्याचा निर्णय शासनाने प्राधान्याने घेणे आवश्यक आहे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे चिटणीस तन्मय गांगुर्डे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here