औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – केज तालुक्यातील बोरगाव येथे सख्ख्या भावाने मित्राच्या मदतीने बहिणीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली .
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील बोरगाव येथे दिनांक २१ एप्रिल बुधवार रोजी शितल लक्ष्मण चौधरी (वय २८) या महिलेचा तिचा भाऊ दिनकर उर्फ दिन गोरख गव्हाणे आणि त्याचा मित्र दिनकर धनंजय वळेकर या दोघांनी तीक्षण हत्याराने डोक्यात वार करून खून केला.
या प्रकरणी मयत शितल हिचा चुलत भाऊ नानासाहेब जालिंदर गव्हाणे याने तक्रार दिली. त्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करीत आहेत.






