मुंबईत संचारबंदी असतांना पत्नीच्या बर्थ डे पार्टीला पोहोचले रणधीर कपूर, झालेत ट्रोल

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – काल बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री बबीता कपूर यांचा वाढदिवस होता. कपूर कुटुंबातील सदस्याचा वाढदिवस म्हटल्यावर पार्टी तर होणारच. करिना कपूर व करिश्मा कपूर यांनी आईसाठी एक छोटीशी पार्टी अरेंज केली होती. करिना कपूरच्या घरी ही पार्टी अरेंज केली गेली. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. करिश्मा कपूर आपल्या मुलासोबत पार्टीसाठी करिना कपूरच्या घरी जाताना दिसली़. सोहा अली खानही पती व मुलीसोबत पार्टीत सहभागी झाली.

रणधीर कपूरही या पार्टीला पोहोचलेत. यादरम्यान रणधीर कपूर गाडीतून उतरून चालण्यासाठी दोन जणांचा आधार घ्यावा लागला. रणधीर यांची ही अवस्था पाहून अनेक चाहते हळहळले. अनेक चाहत्यांनी त्यांना कोरोना काळात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. या पार्टीचे फोटो पाहून करिना व करिश्मा युजर्सच्या निशाण्यावर आल्या.

मुंबईत संचारबंदी आहे आणि हे पार्टी करण्यात बिझी आहे, असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने रणधीर यांच्याबद्दल चिंता व्यैत केली. ‘महामारीच्या काळातही पार्टी सुरु आहे. रणधीरजींची प्रकृती ठीक दिसत नाहीये. अशास्थितीत त्यांना घरी राहायला हवे,’असे या युजरने लिहिले.

राजीव कपूर यांचे निधन झाले आणि पाचव्याच दिवशी कपूर कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येत रणधीर कपूर यांचा वाढदिवस साजरा केला होता. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि नेटकरी जणू कपूर कुटुंबावर तुटून पडल होते. राजीव कपूर यांच्या निधनाला 5 दिवसही झाले नसताना हे लोक पार्टी कसे करू शकतात?असा सवाल अनेक सोशल मीडिया युजर्सनी केला होता. या लोकांच्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात का? हे लोक इतके स्वार्थी कसे असू शकतात? अशा शब्दांत लोकांनी कपूर कुटुंबाला ट्रोल केले होते. इतके की, कपूर कुटुंबावर टीका होताच रणधीर कपूर यांना स्वत: खुलासा द्यावा लागला होता.’आमच्या घरी कोणतीही बर्थ डे पार्टी झाली नाही. झाली ती फक्त एक मीटिंग. एक शोकसभा. कुठलेही सेलिब्रेशन झाले नाही. छोट्या भावाच्या मृत्यूने मी खचलो आहे. त्याला आम्ही सगळे मिस करत आहोत. संपूर्ण कपूर कुटुंब सध्या दु:खात आहे. शोकाकूल आहे,’ असा खुलासा त्यांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here