बिहारमधील मधुबनीत दोन साधुंची हत्या; एका आरोपीला अटक

मधुबनी (बिहार) – येथे काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच, मंगळवारी भोरमधील मंदिराजवळ दोन साधुंची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर परिसरात खळबळ माजली आहे.

जिल्ह्यातील खिरहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिर परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोन साधुंची निर्घृण हत्या करण्यात आली. बेनीपट्टीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात एका पुजाऱ्याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीवरून ही हत्या दीपक चौधरी याने केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दीपक चौधरीला अटक करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे मारले. मृत साधुंची ओळख पटवण्यात आली आहे. हिरा दास (वय ६०) आणि आनंद झा (वय ३८) असे दोन्ही साधुंची नावे आहेत. दोन्ही साधुंची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पुरले होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here