आता चक्क ऑक्सिजन सिलेंडरवरही भाजप नेत्याचा चेहरा

माजी आमदार हिरा सोलंकी यांचा प्रताप; ऑक्सिजन सिलिंडरवर फोटो छापून श्रेय मिळवण्याचा प्रयत्न

अहमदबाद (गुजराथ) – एकीकडे देशात करोना परिस्थितीनं आणीबाणीसदृश्यं परिस्थिती निर्माण केलीय तर दुसरीकडे मात्र नेत्यांची फोटोंची हौस काही फिटताना दिसत नाही. गुजरातमध्ये एका भाजप नेत्यानं चक्क गंभीर रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरवरच आपले फोटो छापले.

अमरेलीतील भाजपचे माजी आमदार हिरा सोलंकी यांनी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेत राजुला भागात २५ बेडस उपलब्ध असणारं एक कोव्हिड सेंटर सुरू केलंय. सिव्हिल रुग्णालयाकडून पाठवण्यात आलेल्या रुग्णांना इथे उपचार मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलंकी यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्याच्या लोकप्रियतेत भर टाकण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरवर त्यांचं पोस्टर छापलं. ही गोष्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियातून अनेक उद्विग्न प्रतिक्रिया समोर आल्या. कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न चांगलाच आहे, परंतु त्या माध्यमातून अशी स्वस्त लोकप्रियता मिळवण्याचा अट्टहास नेत्याला शोभा देणारं नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here