पुणे (प्रतिनिधी) – एक सामजिक बांधिलकी या नात्याने भरारी ग्रुपच्या वतीने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बावधन येथील टेकडीवर वृक्षारोपण करुन ” वृक्ष आमचे, पाणी तुमचे ” ह्या अभिनव अभियानाची सुरुवात करण्यात आली.
कोरोना महामारीच्या काळात तुमचे आमचे सर्वांचेच काही जवळचे आप्तस्वकीय या कोरोना नावाच्या महामारीने गिळंकृत केले आहे.निसर्गाने आपल्याला मोफत दिलेल्या प्राणवायू (ऑक्सीजन ) चे महत्त्व आजपर्यंत आपण दुर्लक्षित केले, परंतु आता याच ऑक्सीजनच्या अभावामुळे देशातील अनेक रुग्णालयात कितीतरी जणांनी जगाचा निरोप घेतला आहे ,ही आजची वस्तुस्थिती आहे. देशभरात निसर्गाचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी आपण आता सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न नाही केले तर काही वर्षानंतर आपल्या पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर नको असेल तर झाडे लावा, झाडे जगवा या शिवाय अन्य कोणता उपाय शिल्लक राहीलेला नाही . झाडांच्या बाबतीत अशीच अनास्था राहिली तर येणाऱ्या काही वर्षात आपल्याला घरात गॅस सिलेंडर नंतर ऑक्सिजन सिलिंडर विकत घ्यावी लागतील.
निसर्गाचा समतोल माणसाने स्वार्थासाठी बिघडवून टाकला आहे, सर्रास झाडांची कत्तल केल्यामुळे निसर्ग ओसाड होत चालला आहे .एक झाड लावल्यानंतर ते मोठे व्हायला दहा वीस वर्षाचा काळ जातो पण तोडायला काही मिनिटे लागतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला होणारी झाडांची कत्तल थांबवा, प्रत्येकाने दरवर्षी आपला वाढदिवस वृक्षलागवड करून साजरा करावा अन्यथा विनाश अटळ आहे . हे चित्र वास्तव परिस्थितीवर अतिशय बोलके आहे. या पुढे झाडांची कत्तल करणार नाही, होऊ देणार नाही आणि मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त व इतर आनंदी दिनाचा उत्सव वृक्ष लागवड करुन व ती जोपासून करेन असा निश्चय करणे गरजेचे बनले आहे.
याच धर्तीवर जागतिक वसुंधरा दिना निमित्त या अभियानाअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबांना विविध प्रकारचे दहा हजार वृक्ष मोफत दिले जाणार आहेत..मात्र वृक्षाला पाणी घालुन ती जोपासण्याची जबाबदारी त्या कुटुंबाची असेल.ज्यांना ह्या अभिनव अभियानात सहभागी व्हायचे आहे त्यानी ७३८५५४०७१३ / ९९७५८३९५०२ या वरती संपर्क करुन सहभाग नोंदवण्याचे आवाहन भरारी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ,या अभियानाचे संयोजक सुभाष सातपुते यांनी केले आहे.






