वसई विरारमध्ये करोना सेंटरला भीषण आग, 13 करोना रुग्णांचा मृत्यू

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) – पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये एका करोना सेंटरला आग लागल्याने 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या करोना कंट्रोल रूमने याची पुष्टी लेली आहे. इतर रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे. आगीची ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजताच घडली असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाला रात्री 3 च्या सुमारास ही आग लागली. या भीषण आगीमध्ये 13 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात यावेळी 17 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 13 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.
https://fb.watch/51XMrYw–l/ वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here