फरासखाना पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महीलांना अन्नधान्याचे वाटप

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोनाच्या ससंर्गामुळे आणि वाढत्या प्रादुर्भावामुळे रोजगार बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे . त्यापैकी देहविक्री करणाऱ्या महिलांची ससेहोलपट होत आहे. वेश्याव्यवसाय करुन उपजिवीका भागविण्याऱ्या महिलांनी काळजी घेण्याबरोबरच स्वतःचा व्यवसाय बंद ठेवला आहे. त्यामुळे संबंधित महिलांची परिस्थिती बिकट होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तेव्हापासून रेड लाईट भागात काम करणाऱ्या महिलांना अन्नधान्य तसेच अत्यावश्यक सेवा पुरवण्याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पुणे शहरातील सामाजीक संस्थानशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले होते. आवाहनास प्रतिसाद देत दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अन्ड इंडस्ट्रीज पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे व उद्योजक दानेश शाह व परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठ पुणे येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना दररोज दुपारी फुड पॅकेट व त्यांच्या मुलांकरता दुधाचे वितरण करण्यात येत आहे.

तसेच साधु वासवानी ट्रस्टकडून अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येत आहे . त्यामध्ये गव्हाचे पीठ , तांदूळ , डाळ , तेल , साखर , चहा पावडर , पोहे इत्यादी जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे. महिलांना अन्नधान्य तसेच तयार जेवनाचे पॅकेट व दूध यांचे वाटप करण्यात आले . यावेळी पोलीस उपायुक्त डॉ . प्रियंका नारनवरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे , पोलीस निरीक्षक राजेश तटकरे , पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत , व साधु वासवानी ट्रस्टचे प्रकाश साधवानी , विजय तलरेजा व स्वयंसेवक , उदयोजक दानेश शाह व परिवार दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अन्ड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष , श्रीरघुनाथ येमुल गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते अलका गुजनाळ , सुरेश कांबळे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here