विदिश (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील विदिशा मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहांची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना संक्रमितांचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या धावत्या गाडीतून मृतदेह रस्त्यावर पडला. मृतदेह पडल्याचे पाहिल्यानंतर रस्त्यावरील लोकांनी आवाज देऊन गाडी चालकाला थांबवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, newsएका वाहनात दोन मृतदेह ठेवता येतात. पण, या गाडीत तीन मृतदेह ठेवले होते. यावेळी धावत्या गाडीतून एक मृतदेह रस्त्यावर पडला. मृतदेह रस्त्यावर पडल्यानंतर काही लोकांनी वाहन चालकाला थांबवले आणि नंतर मृतदेह गाडीत ठेवून स्मशानभूमीकडे नेण्यात आला.
विदिशाच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमधून यापूर्वीही धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 एप्रिलला संशयित कोरोना रुग्णाला दोनवेळा मृत घोषित केले होते. कुटुंबियांना मृत्यू प्रमाणापत्रही दिले होते. कुटुंबिय अंत्यविधीची तयारी करू लागले, तेव्हा हॉस्पिटलमधून फोन आला, तुमचा पेशंट जिवंत आहे.






