पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये काही घटकांना सूट देण्यात आली आहे. मात्र काहीजण काही काम नसताना बाहेर फिरतात. यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. पोलिसांनी चौकाचौकात चेकपोस्ट केले आहेत. मात्र यामुळे पोलीस प्रशासनावरही ताण पडला आहे. मात्र या तणावामुळे पोलिसांच्या चिडचिडेपणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भोसरी पोलीस ठाण्याच्या परिसरात वाहतूक पोलिसाने मुख्यालय पोलीस कर्मचाऱ्याला लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 52 वर्षीय पोलीस हवालदार किसन गराडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर वाहतूक पोलीस सूरज जालिंदर पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दापोडी हॅरिश पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी आरोपी सुरज पवार कर्तव्यावर आले नव्हते म्हणूनपोलीस कर्मचारी किसन गराडे यांनी त्यांना फोन करून हजर राहण्याबाबत विचारलं. तर त्यावेळी त्यांना, तू माझा बाप आहेस का? तू मला कोण सांगणारा?’, अशी भाषा सुरजने वापरली. त्यानंतर त्याला नाकाबंदी ठिकाणी येण्यास सांगितलं.
दरम्यान, सुरज नाकाबंदी ठिकाणी आल्यावर तेव्हा तो हातात लोखंडी गज घेऊन आला. किसन गराडे यांच्या पायावर गजाने मारहाण केली. त्यांना खाली पडलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सुरज पवारवर दाखल करण्यात आला आहे.






