डॉ. कफील खान यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध धरणगांव तहसीलला निवेदन

धरणगाव (प्रा.पी.एम.पाटील) – डॉक्टर कफील खान यांना तात्काळ सोडण्यात यावे तसेच NRC/CAA च्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या JNU जामिया मिलिया इस्लामिया , अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर ज्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत त्या मागे घेण्यात यावेत. यासंदर्भात आज महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे तहसिलदार , धरणगाव यांना निवेदन देण्यात आले. धरणगाव तहसिल चे साळी साहेब यांनी या निवेदनाचा स्वीकार केला. निवेदनात केलेल्या मागण्यांच्या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी , अशी मागणी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व सर्व सहयोगी संघटनांच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सिराज कुरेशी , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , बामसेफ चे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील , बामसेफचे तालुका उपाध्यक्ष हेमंत माळी सर , बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार , छत्रपती क्रांती सेनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते नगर मोमीन , सागर साळवे , विनोद बीजबीरे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here