भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 11 हजार पोस्टकार्ड पत्र पाठवण्यास सुरुवात.

यावल (सुरेश पाटील) – भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदस्य निवडीच्या वेळेस भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांना जय भवानी जय शिवाजी ही घोषणा देण्यापासून रोखल्याने व्यंकय्या नायडू यांच्या निषेधार्थ यावल तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध म्हणून 11 हजार कार्ड पाठविण्यास आज पासून यावल पोस्टातून सुरुवात करण्यात आली.
यावल तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पोस्ट कार्यालयामार्फत पोस्टकार्ड आज दिनांक 24 जुलै 2020 शुक्रवार पासून पाठविण्यास सुरुवात करण्यात आली यावल तालुक्यातील एकूण 11 हजार निषेधार्थ पोस्टकार्ड पाठविले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल तालुकाध्यक्ष देवकांत बाजीराव पाटील यांनी दिली.
पोस्ट कार्डात नमूद करण्यात आले आहे की परवा झालेल्या नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य निवडच्या वेळीस शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. त्यावर, “हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही,” अशी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी समज दिली.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाजपाच्याच खासदाराला ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देण्यापासून रोखलं. यावरुन भाजपाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय भावना आहेत हे दिसून आलं.
तसेच महाराष्ट्राबद्दल भाजपा वरिष्ठ जबाबदार नेत्यांच्या मनात किती द्वेष आहे हे दिसतं.
‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा देण्यापासून खुद्द छत्रपतींचे वंशज आणि श्रीमंत उदयनराजे भोसले महाराजांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा मी एक शिवप्रेमी म्हणून जाहीर निषेध करतो.
छत्रपती आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या दिल्लीने लक्षात ठेवावे की, आमच्या रगारगात शिवछत्रपतींचे रक्त आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू.
या सर्व घटनेचा निषेध म्हणून यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं 11 हजार पत्रं पाठवून निषेध केला जाणार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड देवकांत पाटील यांनी दिली आहे.या वेळी यावल पोस्ट ऑफिस मध्ये नायडूनच्या कृतीच्या निषेधार्ह पत्रे पाठवण्यात आले या वेळी यावल युवक अध्यक्ष देवकांत पाटील , राष्ट्रवादी जिल्ह्य सरचिटणीस प्रशांत पाटील गिरडगाव , जिल्ह्य उपाध्यक्ष विनोद पाटील , तालुका सरचिटणीस किशोर गोलू माळी , हितेश गजरे , अमोल दुसाने , आशुतोष पाटील , राकेश सोनार , शरीफ तडवी , नरेंद्र सोनवणे , महेंद्र तायडे , ओम पाटील , निलेश बेलदार , भूषण पाटील , पावन राजपूत , अनिल पाटील इत्यादी राष्ट्रवादी युवक कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here