श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकर यांची पुनर्नियुक्ती

मुंबई (सुदर्शन सुर्वे) (दादर श्री सिद्दीविनायक मंदिर) -आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पदी शुक्रवार दिनांक २४ जुलै २०२० पासून पुढील तीन वर्षकरिता पुनर्नियुक्ती करण्यात आली.

आदेश बांदेकर गेली तीन वर्षे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ही नियुक्ती शासनामार्फत करण्यात येते. या पदाचा कार्यकाळ आज, २४ जुलै रोजी संपत होता. या पार्श्वभूमीवर आदेश बांदेकर यांची या पदावर पुनर्नियुक्ती होणार, याची आधीपासूनच चर्चा होती. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाले. आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासावर पुनर्नियुक्ती करण्याबाबतचा आदेश आज निघाला आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे.
दरम्यान, आदेश बांदेकर यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा कारभार गेली तीन वर्षे चांगल्या पद्धतीने हाताळला. देशावर, राज्यावर वा मुंबईवर आलेल्या अनेक संकटांच्या काळात न्यासाने सढळहस्ते मदतीचा हात पुढे केला. सध्या सर्वत्र करोनाने थैमान घातले असताना या संकटातही न्यासाने विविध माध्यमांतून समाजभान जपलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here