मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – मराठी नाट्य व्यवस्थापक आणि बुकिंग क्लार्क संघाला विरार येथील मनसे पक्षाचे तरुण आणि
तडफदार महाराष्ट्र सैनिक यश रानडे आणि ध्यास नवनिर्माणाचा या समूह तर्फे धान्य स्वरूपात मदत करण्यात आली. गुरुवार, दिनांक २३ जुलै २०२० रोजी बोरिवली येथील ठाकरे हॉल, विलेपार्लेचे दीनानाथ नाट्यगृह, दादर येथील शिवाजी मंदिर, दामोदर हॉल, परेल आणि ठाणेचे गडकरी रंगातयन येथे जीवनावश्यक वस्तू, धान्य, तेल, मास्क व आरस्निक च्या गोळ्या (औषध) या वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे वाटप करताना स्वतः यश रानडे हे उपस्थित होते. तसेच त्यांचे सहकारी व्यवस्थापक व बुकिंग क्लाक संघाचे अध्यक्ष गोट्या सावंत, कार्यवाहक हरी पाटणकर, खजिनदार नितीन नाईक, जितू पाटील, प्रणित बोडके, नंदू पणशीकर, कपिल चंदन, शिवम पाटणकर, प्रवीण दळवी, विजय सूर्यवंशी, अरविंद घोसाळकर व इतर सर्व पदाधिकारी व सदस्य यांची सुद्धा हजेरी दिसून आली. या सर्वांनी यश रानडे यांचे आभार मानले.
संघातर्फे यश रानडे यांना आपल्याकडून संघाला मदत मिळावी. अशी विनंती करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी विलंब न करता होकार दिला. त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल दोन दिवसात १०० हुन अधिक धान्याचे किट्स उपलब्ध करून दिले. याबद्दल व्यवस्थापक संघ त्यांचे कायम ऋणी राहील असे मत हरी पाटणकर यांनी व्यक्त केले. यश रानडे यांनी मराठी नाट्य कर्मींसाठी हे कार्य करून समाजामध्ये नक्कीच एक चांगला संदेश दिलेला आहे. त्यामुळे त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्व नाट्यकर्मींकडून शुभेच्छाही देण्यात आल्या. तसेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडणारे सर्वांचे लाडके हरी पाटणकर आणि त्यांच्या सर्व मंडळींचे देखील आभार मानण्यात आले. कारण आजच्या काळात दुसऱ्यांसाठी धडपड करणारे समाजसेवक मिळणे तर दूरच पण ऐकायला मिळाले तरी खूप झाले. म्हणून यांच्या देखील संपूर्ण टीमचे शिवाजी मंदिर द्वारपाल वर्ग आणि सुरक्षा रक्षक कर्मचारी यांच्यावतीने सर्वांचे आभार प्रमोद घोगरे यांनी मानले. राज साहेब यांच्याप्रमाणे राज ठाकरे यांच्या मनसैनिकांचे सुद्धा खरोखरच रंगभूमीवर खूप प्रेम आहे. हे या मदतीवरुन स्पष्ट झाले. असे मत ही व्यक्त करण्यात आले.








