आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांची महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या सदस्यपदी निवड

चोपडा (संदिप ओली) – चोपडा विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांची महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करण्यात आली असून यात चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांचा समावेश केला आहे.
या समितीतील पदाधिकारी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- अध्यक्ष,आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी – उपाध्यक्ष, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे- सदस्य, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे (चोपडा),आमदार दौलत दरोडा,आमदार नितीन पवार (कळवण),आमदार सुनील भुसारा यांचेसह एकूण वीस सदस्यांची समिती आहे. आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या नियुक्तीबद्दल पंचक्रोशीतुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here