जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – सध्या जळगाव शहरास जिल्हाभरात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने पंधरा दिवसांचा लॉक डाऊन लावण्यात आल्याने ठिक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
या काळात पोलिस बांथवांना जेवण व पाण्याच्या बाटल्या सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे व त्यांच्या मित्रांनी रविवारी सायंकाळी वाटप केले.

जळगाव शहरातील चौकाचौकात कार्यरत असलेले पोलीस सहकारी बांधव यांना जेवण आणि पाण्याच्या बाटल्या पुरवतांना मनोज ठाकरे व त्यांचे मित्रमंडळी रमेश चंदन राहुल पाटील आदी उपस्थित होते.






