भंडारा स्मशानभूमीत मृत्यूपूर्वीच सरण रचून ठेवण्याची दुर्देवी वेळ

भंडारा (प्रतिनिधी) – देशभरात थैमान घालणाऱ्या करोना संसर्गाने अनेकांचा जीव घेतला. अनेक राज्यांमध्ये मृतांचा आकडा एवढा वाढला की, स्मशानभूमीवर दोन दोन दिवसांची वेटींग आहे. मात्र महाराष्ट्रातील भंडारा येथे हृदय पिळवटून टाकणारं चित्र दिसत आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. भंडाऱ्याच्या स्मशानभूमीत कधी न पाहिलेले चित्र सध्या रोज पाहायला मिळत आहे. मृत्यूपूर्वीच सरण रचून ठेवण्याची दुर्देवी वेळ भंडारा प्रशासनावर आली आहे. येथे एकाच वेळी 20-25 करोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.

जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडाही वाढल आहे. भंडारा शहरालगत असलेल्या गिरोला स्मशानभूमीत रोज 20 ते 25 लोकांवर अंतसंस्कार केले जात आहे. अंत्यसंस्कारासाठी वेटींग नकोय यासाठी भंडारा प्रशासन काळजी घेताना दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळं ६७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here