जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव शहराला आता पाण्याचा पुरवठा हा सुरळीत सुरू असून नागरिकांनी सहकार्य केल्यास पाउसाळ्यापर्यंत पाण्याची कमतरता भासू देणार नाही असेसूतो वाच न.पा.चे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी त्यांची पाण्यासंदर्भात चर्चा केली असतांना सांगितले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ज्या वेळेस नळाला पाणी येते त्या वेळेस मी अनेकदा दुचाकीने गावात राऊंड मारत असतो नागरिक आपले पाणी भरले गेल्यावर सुद्धा नळ कनेक्शन बंद करत नाहीत काही संडासीत नळ लावतात काही दुचाकी धुतात त्यामुळे फिल्टर झालेले पाणी खूप वाया जाते याचा विचार प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे आपले पाणी भरले झाल्यानंतर नळाला तोट्या लावाव्यात पाणी वाया जाऊ देऊ नये असे केल्यास पुढील नागरिकांनाची पाण्याची सोय होईल आता आठ दिवसात नियमित पाणी येत असून ज्या अडचणी उदभवल्या होत्या त्या आता निययित झाल्या असून तापीच्या डोहात ही पुरेसा साठा असून गुळ प्रकल्पावरून आपण पाणी घेवु शकतो शिवाय वेळ पडल्यास अंजनीचे पाणी सुद्धा उपलब्ध होवू शकते आपण आवर्तन घेवू शकतो
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले धरणगावातील नागरिकांना या पुढे पाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ देता कामा नये त्यामुळेच ॲडव्हान्स मध्ये एक ते दोन महिन्यात 70 ते 80 लाख रुपये किमतीच्या दोन नवीन मोटरी न.पा विकत घेणार असून जुन्या मोटारी नादुरुस्त झाल्यास तर एका तासाच्या आत नवीन मोटारी आपण सुरू करू शकतो असे नियोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी पाईपलाईन जुन्या असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात खराब पाणी आल्यास तसे तात्काळ संपर्क साधून न.पा कडून आपले काम करून घ्यावेत नागरिकांनी योग्य सहकार्य केले तर भविष्यात उन्हाळ्यात सुद्धा पाण्यासाठी कोणालाही वन वन फिरावे लागणार नाही अशी माहिती मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी दिली.






