पोलीस – होमगार्ड संघर्ष समितीमार्फत ठाण्यातील आजारी नागरिकांच्या मदतीला अबोली रिक्षाचालक – मालकांची फौज

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – महाराष्ट्र पोलीस ,होमगार्ड संघर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धार्थ डी जाधव, निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धीरज पार्सेकर , मुंबई अध्यक्ष अमोल माने, यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडून कोरोना चा संसर्ग थांबवण्यासाठी आजाराने त्रस्त रुग्णांना व ज्येष्ठ नागरिकांना योग्य मदत मिळावी यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखा व होमगार्ड संघर्ष समितीचे ठाणे अध्यक्ष सतीश बनसोडे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या अबोली रिक्षांची फौज तैनात केली आहे आयपीएस पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील संचार बंदी कालखंडामध्ये रिक्षा द्वारे मोफत सेवा देण्याची माहिती दिली

संचारबंदी कालखंडामध्ये गरीब गरजू लोकांना आजारामध्ये कोणतीही कमतरता भासू नये म्हणून योग्य मदत मिळावी यासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आयपीएस यांनी पोलिसांना आदेश दिले होते गरजू रुग्णांना वेळेत वाहन उपलब्ध होत नसल्याने अनेकदा उपचार घेण्यासाठी विलंब होत होता त्यामुळे वाहतूक शाखा यांना सदर बाब निदर्शनास आली त्या अनुषंगाने महिला अबोली चालक-मालक वाहन उपलब्ध करुन दिल्यास ती अडचण दूर होईल त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे होमगार्ड संघर्ष समिती अध्यक्ष सतीश बनसोडे व वाहतूक जिल्हा अध्यक्ष सौ प्रीती खानेकर यांनी अबोली रिक्षाचालकाशी संपर्क करून निर्बंधांना ची अंमलबजावणी करीत असताना नागरिकांच्या सोयीसाठी अबोली रिक्षा चालक व मालक यांच्या मदतीने नागरिकांना अत्या आवश्यक सेवेसाठी मोफत गरीब गरजू रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या योजनेला प्रतिसाद दिला

या योजनेमध्ये 22 महिला रिक्षाचालकांनी सहभागी झाल्या कोरोणाचे संपूर्ण देशावर मोठे संकट उभे ठाकले आहे पहिल्या लाटेच्या वेळी संचार बंदी च्या काळात अनेक रुग्णांना वाहनेही मिळाली नाहीत त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून गरोदर महिला डायलिसिस साठी जाणारे रुग्ण आणि नियमित तपासणी ला जाणाऱ्या रुग्णांना रिक्षाच्या मागणीनुसार मोफत सेवा पुरवली जाणार असल्याचे सौ सरोज पोटफोडे अबोलीच्या चालक यांनी आपले मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here