आटपाडी (प्रतिनिधी) – जागतिक किर्तीच्या माडगुळे येथे “माडगुळकर बंधूचे स्मारक, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नांबरोबर गारपीठीने नुकसान झालेल्या शेंडगेवाडी सह अन्य ठिकाणच्या गारपीठग्रस्तांना मदत करणे विषयी खानापूर – आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री तथा पालक मंत्री ना जयंतराव पाटील यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर – आटपाडी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांच्या नेतृत्वा खालील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने ना जयंतराव पाटील यांची इस्लामपूर येथे कारखाना , दुध संघ स्थळावर भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करीत मागण्यांची निवेदने सादर केली . यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बापू पाटील हे उपस्थित होते . शिष्टमंडळात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यां समवेत माडगूळे ग्रामस्थांचा समावेश होता .राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, राष्ट्रवादीच्या सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, सामाजीक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब लिंगडे , माडगूळे ग्रामपंचायतीचे सदस्य अमोलशेठ विभूते, नितीन लिंगडे, बागायतदार यशवंत खळगे यांचा या समावेश होता .
परमेश्वरी शक्तीचा अंश लाभलेल्या महाराष्ट्र वाल्मीकी ग . दि .माडगूळकर, थोर साहित्यीक व्यंकटेशतात्या माडगूळकर, प्रा. डॉ. अंबादास माडगूळकर, कथाकार अॅडव्होकेट नानासाहेब झोडगे आदी महनीयांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या जगविख्यात ” माडगुळे ” गावी बामणाचा पत्रा, माडगूळकरांचे निवास स्थान, संरक्षित करून, माडगुळकर बंधुचे जागतिक उंची आणि दर्जाचे स्मारक निर्माण करणे, माडगुळे गावी येणाऱ्या देशभरातील साहित्यप्रेमी, माडगूळकर प्रेमींसाठी प्रशस्त २५ सुटचे शासकीय विश्रांतीगृह निर्माण करणे , महाडीकवस्ती – लिंगडे वस्ती वगैरे वस्त्यांवरील पिण्याच्या प्रश्न माडगुळे प्रादेशीक नळपाणी योजनेतून सोडविणे आणि सांगोला तालुक्यातल्या बुध्दीहाळ तलावाच्या, माडगुळेतील महाडीकवस्ती लगतच्या कॅनॉल मधून नवा प्रवाही मार्ग ( आऊटलेट गेट ) माडगूळे ओढ्यावरील बंधारे भरण्यासाठी काढणे तसेच लेंगरेवाडी – बंडगर वाडी – माडगूळे – शेटफळे या चार रस्त्याच्या चौकाजवळच्या बंदीस्त पाईपलाईन मधून नव्या सुविधेद्वारे माडगूळे ओढ्यावरील सर्व बंधारे भरून देण्याची माडगुळे ग्रामस्थांची मागणी पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांकडे केली .
दि . १४ एप्रील रोजी सायंकाळी झालेल्या गारपीठीने आटपाडी तालुक्यातल्या काही गावात हानी झाली आहे . शेंडगेवाडी (आटपाडी ),बनपूरी, तडवळे ,मुढेवाडी, भिंगेवाडी, नांगरेमळा (आटपाडी ) या ठिकाणी झालेल्या गारपीठीने सर्वत्र थोडे फार नुकसान झाले असले तरी सर्वात मोठा फटका शेंडगेवाडी या आटपाडी ग्रामपंचायतीचाच भाग असलेल्या तथापि आटपाडी पासून २२ कि.मी. अंतरावरील या वाडीला बसल्याचे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणले .शेंडगेवाडीत झालेल्या गारपीट नुकसानीचे पंचनामे केले गेले असून एकूण ६२ शेतकऱ्यांचे.ऊस, डाळिंब, मका व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . एकूण १७ हेक्टर बाधित क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या गारपीठीने परिसरातील झाडे, पक्षी ,कोंबड्या यांचे नुकसान झालेच तयापि एक बोकडही गारपीठीत सापडून मेला आहे . तालुक्यातील इतर ठिकाणां बरोबर शेंडगेवाडी येथे झालेल्या नुकसानीबाबत गारपीठ ग्रस्तांना शासनाकडून योग्य ती मदत सत्वर मिळावी अशी विनंती मंत्री महोदयांकडे करण्यात आली . शेंडगेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, अत्यंत धोकादायक बनलेला बनपूरी – शेंडगेवाडी हा ६ कि.मी. चा रस्ता तातडीने खडीकरण ,डांबरीकरण युक्त करून दिला जावा . या प्रश्नांकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले .या विविध प्रश्नांवर संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सुचित करण्याचे निर्देश पालक मंत्री महोदयांनी आपल्या यंत्रणेस दिले .






