युनिव्हर्सल हुमन राइट कौन्सिल भारत मुंबई टीम व अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मास्क व पाणी वाटप

मुंबई (विशेष प्रतिनिधी महेश्वर तेटांबे) – आज दिनांक २६/०४/२०२१ रोजी युनिव्हर्सल हुमन राइट कौन्सिल भारत मुंबई टीम व अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पोलीस कमिशनर श्री हेमंत नगराळे सर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई मधील उन्हातान्हात उभे राहून नाकाबंदी साठी व लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांसाठी त्यांच्या कर्तव्यावर असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना मोफत पाणी व मास्क वाटप करण्यात आले.

mumbai-police

या कार्यक्रमास सुरुवात सकाळी ११.३० पासून दादर टी. टी सर्कल येथून करण्यात आली. १)चित्रा टॉकीज येथे नाकाबंदी वर असलेल्या पोलीस अधिकारी व शिपाई यांना पाणी वाटप करण्यात आले,२)लालबाग गणेश गल्ली येथे पाणी वाटप करण्यात आले,३)तेजुकाया मेंशन,४) हिरामणी मार्केट पोलीस बीट, ५)काळाचौकी पोलीस ठाणे, ६)नागपाडा वाहतूक पोलीस चौकी,भायखळा या सर्व ठिकाणा वरील जवळ जवळ १५० ते २०० पोलीस अधिकारी व शिपाई यांना मोफत पाणी,मास्क वाटप करण्यात आले. पोलीस दलाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोकुळ सिंग पाटील साहेब ( काळाचौकी पोलीस ठाणे) यांनी युनिव्हर्सल ह्यूमन राईट कौन्सिल व अक्षरा सामाजिक संस्थेचे आभार मानले.

akshara-samajik-pratisthan

या कार्यक्रमास महाराष्ट्र कार्याध्यक्ष जितेंद्र दगडू दादा सकपाळ,मुंबई महासचिव व अक्षरा संस्थेचे अध्यक्ष अमोल वंजारे, चिंचपोकळी ब्लॉक प्रेसिडेंट सौ.वसुधा वाळूंज, दादर ब्लॉक प्रेसिडेंट सचिन जाईजोडे, संजीव परमार,अंजली भोसले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here